अजित पवार यांनी परत यावे : प्रशांत जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

पुणे : लांडग्याच्या युतीत जाऊन वाघाला समाधान लाभत नाही तो अस्वस्थच असतो”.”पोटाची खळगी भरते पण रुबाब आणि आदर जातो .लांडग्याच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा होण्याची संधी वाघाकडे कायम असते”अशा आशयाचे ट्विट करत प्रशांत जगताप यांनी अजित पवारांना पक्षात पुन्हा परत यावे त्यासाठी साद घातली आहे

. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे 9 आमदारासह 2 जुलै रोजी सहभागी झाले होते. त्यानंतर आजही शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी पक्षात पुन्हा परत यावे असे वाटते.

Latest News