पुनीत बालन यांना अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स. लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याने 3 कोटी 20 लाखांचा दंड


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
ऑक्सिरिच कंपनीच्या पुनीत बालन यांना दहिहंडी उत्सवाचे दरम्यानचे कालावधीत अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याने 3 कोटी 20 लाखांचा दंड भरणेबाबतचे आदेश पुणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत.
यासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. माधव जगताप यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४२४५ व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे (स्काय साईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम, २०२२ चे तरतुदीनुसार जाहिरात फलक उभारण्यासाठी पुणे महानगरपालिकेची रितसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.
तसेच महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम, १९९५ चे तरतुदीनुसार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलेला आहे