उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-पुणे- अजित पवारअकोला- राधाकृष्ण विखे- पाटीलसोलापूर- चंद्रकांत दादा पाटीलअमरावती- चंद्रकांत दादा पाटीलभंडारा- डॉ.विजयकुमार गावितबुलढाणा- दिलीप वळसे-पाटीलकोल्हापूर- हसन मुश्रीफगोंदिया- धर्मरावबाबा आत्रामबीड- धनंजय मुंडेपरभणी- संजय बनसोडेनंदुरबार- अनिल पाटीलवर्धा – सुधीर मुनगंटीवार
भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर तीन (Pune) महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तर, विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर, अमरावती या दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्यातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये अजित पवार हे 2 जुलै रोजी समर्थक आमदारांसह सहभागी झाले. पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत नऊ जणांनी कॅबेनिट मंत्रीपदाची शपथ घेतली. पवार यांच्याकडे अर्थखाते आहे.त्यांचे समर्थक राज्यांचे कारभारी होते. पण, जिल्ह्याचे नव्हते. (Pune) उपमुख्यमंत्री झाल्यापासून पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष्य घातले होते. पालकमंत्री नसतानाही अधिका-यांच्या बैठका घेण्याचा धडाका लावला होता.जिल्हा नियोजन समितीचा निधी रोखला होता. पवार आणि पाटील यांच्यात कोल्डवार सुरु असल्याची चर्चा होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारही केली होती.पत्रकारांनी सुपर पालकमंत्री आहात का असे विचारले असता तुझ्या तोंडात साखर पडो असे सांगत अजितदादांनी पालकमंत्री होण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखविली होती.
अजित पवार यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यास भाजपसह शिंदे यांच्या शिवसेनेचा तीव्र विरोध होता. अजित पवार हे राष्ट्रवादीच्याच आमदारांना निधी, ताकद देत असल्याचे त्यांचे गा-हाणे होते.
चंद्रकांतदादांऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पालकमंत्रीपद देण्याची मागणी भाजपकडून केली जात होती. पण, अजित पवार हे देखील पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर ठाम होते. पालकमंत्रीपदावरुन अंतर्गत संघर्ष सुरु होता.या वादातूनच पालकमंत्रीपद रखडल्याचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने दिले होते. अखेरिस दिल्ली दौ-यानंतर एकनाथ शिंदे यांनी 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली. त्यात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले.
2014 ते 2019 शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना शेवटच्या सहा महिन्यांसाठी पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते.त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार जावून शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे सरकार 2022 मध्ये आले. कोथरुडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे दुस-यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते.पण, तीन महिन्यांपूर्वी अजित पवार सत्तेत सहभागी झाले. तेव्हापासूनच पाटील यांचे पालकमंत्रीपद जाणार अशी चर्चा होती. अखेरिस आज त्यांच्याकडील पुण्याची जबाबदारी काढण्यात आली. त्याबदल्यात त्यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.त्यांची नाराजी दूर करण्यासाठीच दोन जिल्ह्यांची जबाबदारी दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.