पुण्यातील एमआयटी विद्यापीठाने काश्मीरच्या पत्रकार सफिना नबी यांना जाहीर केलेला पुरस्कार रद्द


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनतर्फे पाचव्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेच्या निमित्ताने सफिना नबी यांना ‘जर्नालिझम फॉर पीस अॅवॉर्ड’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.पुरस्कार प्रदान कार्यक्रम बुधवारी पुण्यात होणार होता. मात्र मंगळवारी हा पुरस्कार रद्द करण्यात आल्याचे सफिना यांना कळवण्यात आले आहे
. सफिना यांनी काश्मीरमधील महिलांना मालमत्तेमध्ये हक्क मिळत नसल्याचा विषय त्यांच्या बातमीतून मांडला होता.राजकीय दबावातून हा पुरस्कार रद्द करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येतोय. अचानक हा पुरस्कार रद्द केल्यामुळे तीन परीक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अंतर्गत विसंवादामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले.