बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये समानता आणण्यासाठी सरकार धोरण राबवणार..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – राज्यातील सुतगिरण्या सुरळीत चालण्यासाठी कर्जावरील व्याज भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. शिवाय राज्यामध्ये आणखी चार धर्मादाय सहआयुक्त पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. बैठकीला मुख्यमंत्र्यांसहमंत्र्यांची उपस्थिती होतीराज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये समानता आणण्यासाठी सरकार धोरण राबवणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन दिली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील आठ निर्णय
- बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण.
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार.
- राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार.
- कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.
इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार.
अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय.
महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार.
राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार.