पुण्यात कोरियन नागरिकाच्या घरावर अज्ञातांचा गोळीबार


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
पुण्यातील औध परिसरात एका कोरियन नागरिकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला. मंगळवारी (६ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. याप्रकरणी रदेशी नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.गोळीबारामुळे तक्रारदार व्यक्तीसह त्यांचे कुटुंबीय धास्तावले. त्यांनी तातडीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना तिथे एक पुंगळी आढळून आली.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरात सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे कायद्याचा धाक संपला की काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे हा गोळीबार नेमका कुणी केला? याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनं परिसरात एकचखळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार परदेशी नागरिक मूळचा दक्षिण कोरियातील आहे. ते चाकण भागातील एका खासगी कंपनीत कामाला आहेत.
परदेशी नागरिक पत्नी आणि मुलासह बाणेर भागातील (Pune News) एका उच्चभ्रु सोसायटीत वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्रीतक्रारदार आपल्या पत्नी आणि मुलांसह घरात झोपले असता अज्ञात आरोपींनी त्यांच्या घरावर गोळीबार केला
. या गोळीबारात घराच्या खिडकीची काच फुटली.पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
.