अजित पवार यांनी छगन भुजबळांना समज द्यावी- शंभुराजे देसाई

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

भडक वक्तव्ये करणारी भूमिका भुजबळ यांची नेहमीची असते. पण आता त्यांनी असे करू नये. अजितदादा यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. आम्ही अजितदादांना उद्या भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की अशी वक्तव्य करू नये, अशी आक्रमक भूमिका शंभूराज देसाई यांनी घेतली शंभुराजे देसाई यांनी आज पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्रामध्ये जाती-जातींमध्ये संभ्रम निर्माण होईल, असं विधान भुजबळांनी करणं चुकीचं आहे. यामुळे राज्यात परिस्थिती खराब होऊ शकते. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहोत. कदाचित उद्याच मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्यामध्ये आम्ही चर्चा करू, असं शंभुराजे देसाई म्हणाले.

राज्यातील महायुती सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीरपणे विरोध दर्शविला आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून छगन भुजबळ यांना वेळीच आवरा, अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे.

दरम्यान, भुजबळांच्या वक्तव्यांवर शिंदे गटाने देखील उघडपणे नाराजी व्यक्त केलीl) मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, याचा विचार सरकारने केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी काल (सोमवारी) केलेलं विधान विधान आश्चर्यकारक असल्याचं शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

Latest News