दुर्गम भागातील आदिवासी व तृतीयपंथीयांना “आनंदाची दिवाळी शिधा” वाटप


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
वाल्हेकरवाडी चिंचवड रविवार दि.०६/११/२०२३ : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि मित्र परीवाराच्या वतीने ज्यांचे हातावरचे पोट आहे जे मोल मजूरी करतात व जे दिवाळी करू शकत नाही अशा गोर गरीब आदिवासी, कातकरी बांधवांच्या आणि पिंपरी चिंचवड शहरातील कुटुंब करून राहणाऱ्या तृतीयपंथीच्या घरी आनंदाची दिवाळी साजरी व्हावी म्हणून त्यांचे घरी जाऊन आनंदाची दिवाळी किट चे वाटप करण्यात आले. यासाठी मावळ तालुक्यातील टाकवे येथील बेलजगांव भागातील आदिवासी कुटूंब, वेल्हा तालुक्यातील कादवे गांव शिर्के वस्ती मधील कातकरी कुटुंब तसेच शहरातील तृतीयपंथीयांच्या ५० कुटुंबांना आनंदाची दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले. दिवाळीचे पदार्थ बनवण्यासाठी लागणारा एकूण २९ किराणा वस्तु, नवीन साडी – पोशाख व एक डबा असे या किटचे स्वरुप होते.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष सुधीर मरळ, संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, सचिव रामेश्वर पवार, महेश जगताप, रुपेश मुनोत, सचिन खोले, गणेश बोरा, संदीप भालके, सुभाष वाल्हेकर, शेखरआण्णा चिंचवडे, वसंतराव ढवळे, सचिन खोले, सोमनाथ हारपुडे, गोविंद जगदाळे सर, आबासाहेब जाधव, अर्चना मेंगडे, रेश्मा बोरा, आशा मरळ, स्वाती वाल्हेकर, रसिका वाल्हेकरव कुटुंबिय उपस्थित होते. या सदस्यांच्या हस्ते आनंदाची दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सुधीर मरळ यांनी गरजुंना शिदा वाटपाचा उद्देश सांगितला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद जगदाळे सर यांनी केले. याबाबत बेलज गावचे सरपंच यांनी व आदिवासी/कातकरी बांधव तसेच तृतीयपंथीयांनी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चे आभार मानले.