सकल धनगर समाजाने उद्या बारामती बंद चे आवाहन

बारामती (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) उपोषण धारकाची भेट तर सोडाच पण साधी उपोषणकर्त्याची चौकशीही केली नाही. यामुळे धनगर बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.बारामतीत सुरू असलेल्या धनगर समाजाच्या बेमुदत उपोषणकर्त्यांपैकी काही आंदाेलकांची आज प्रकृती खालवली. या आंदाेलकांना पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधवांनी उद्या बारामती बंदची हाक दिली आहे. त्याबाबतचे निवदेन धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.

– बारामती येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून समाज बांधव बेमुदत उपाेषणास बसले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले पत्र देत माझा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्या मागणीस संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे

.बारामती येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाने उद्या (गुरुवार, १६ नोव्हेंबर) बारामती बंदची हाक दिली आहे. त्याबाबतचे निवदेन धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे

.या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असूनही सरकारच्या वतीने कोणीही अद्याप दखल घेतली गेलेली नाही. दरम्यान महाराष्ट्रातील धनगर बांधवाकडून सरकारचा तसेच बारामतीत दिवाळी निमित्त ) चार दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत.

Latest News