९ डिसेंबर रोजी देविका वेंकटसुब्रमणियन यांचे एकल भरतनाट्यम नृत्य सादरीकरण

*९ डिसेंबर रोजी देविका वेंकटसुब्रमणियन यांचे एकल भरतनाट्यम नृत्य सादरीकरण भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत देविका वेंकटसुब्रमणियन (मुंबई)यांच्या एकल भरतनाट्यम नृत्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. एस पी श्रीनिवासन यांच्या त्या शिष्या असून पारंपरिक भरतनाट्यम मार्गम आणि रामायणातील उर्मिला या विषयावर नवी नृत्यरचना सादर करणार आहेत

. हा कार्यक्रम शनीवार, ९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १९७ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली

Latest News