कर संकलन विभागाचे मालमत्ता सर्वेक्षण आर्थिक मजबुतीसाठी क्रांतिकारक ठरणार, यंदा च्या वर्षी एक हजार पाचशे कोटीचे टार्गेट


कर संकलन विभागाचे मालमत्ता सर्वेक्षण आर्थिक मजबुतीसाठी क्रांतिकारक ठरणार
!!सब हेड- तब्बल 35 टक्के नव्या मालमत्ता कराच्या कक्षेत येण्याचा प्राथमिक अंदाज –
आर्थिक दृष्ट्या मार्गावर येण्याची एकमेव सुवर्णसंधी
पिंपरी-(ऑनलाईन परिवर्तनाच सामना ) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी वर कर संकलन विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात आज अखेर 640 कोटींचा कर वसूल केला आहे. यंदा 1 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता सर्वेक्षण आणि मालमत्ता कर नोंदणी अभियानामुळे आगामी आर्थिक वर्षात मागील करांची थकबाकी आणि चालू मागणी असे मिळून 1500 कोटी रुपये महापालिका तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे
चिंचवड – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्तांचे सर्वेक्षण आणि नवीन मालमत्ता कर नोंदणी अभियान सुरू आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्ता करकक्षेत येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा निर्णय क्रांतीकारी ठरणार असून नागरिकांनी मालमत्ता कर नोंदणी अभियानाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे
.सध्या महापालिकेत अनेक भांडवली केंद्री प्रकल्प चालू असून भविष्यात याच्या व्यवस्थापनासाठी वाढीव निधी कुठून आणणार असा प्रश्न येत्या दोन तीन वर्षात निर्माण होणार आहे. त्यासाठी आजच पावले उचलली नाही तर पालिकेला आर्थिक अरिष्टाला तोंड द्यावे लागणार हे नक्की आहे. यासाठी उत्पन्नाचे स्थायी स्त्रोत निर्माण करणे हे तातडीचे झाले आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊनच एकंदरीत मालमत्ता कर प्रणालीचा अभ्यास करून आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वंकष मालमत्ता आकारणीची योजना आखून त्याला मूर्त स्वरूप दिले आहे. योजनेची अंमलबजावणी होऊन फक्त तीनच महिने झाली असून आता त्याची मूर्त स्वरुप दिसू लागले आहे. हे सर्वंकष अभियान एकूणच पालिकेची आर्थिक स्थिती अमुलाग्र बदलणार अशी तरी सध्या चिन्हे आहेत.

.मालमत्ता कर नोंदणी अभियानामुळे आगामी आर्थिक वर्षात महापालिकेची डिमांड दुपट्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या महापालिकेची जी आर्थिक स्थिती आहे, ती पुरेशी सक्षम नाही. या प्रकल्पामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम होणार आहे. महापालिकेचा वाढता वेग लक्षात घेता आणि विविध विकास कामांच्या प्रकल्पांना निधी पुरविणे शक्य होणार आहे. यामुळे महापालिका करदात्या नागरिकांना दर्जेदार सेवा-सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.
आम्ही यंदा कोणतीही करवाढ प्रस्तावित केली नाही. वार्षिक भाडे मुल्यांमध्ये वाढ केली नाही. मात्र, शहरातील ज्या मालमत्तांची नोंदणी झाली नाही त्या कर कक्षेत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत येत्या 15-18 महिन्यात संपविण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे.- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक
हे सर्वेक्षण महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये सर्व मालमत्तांचे नोंदणी अभियान यामार्फत होणार आहे. यासाठी लागणारी सर्व आवश्यक मदत कर संकलन विभागाला उपलब्ध करून दिली आहे. कर संकलन विभाग हे सर्वेक्षण यशस्वी करेल याची खात्री आहे. मी स्वतः याच्या फॉलो अप घेत आहे.प्रदीप जांभळे-पाटीलअतिरिक्त आयुक्त
सर्व मालमत्ता कर नोंदणी अभियानात आल्यानंतर या मालमत्तांना डिजिटल लाॅकर ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे या मालमत्तांची एकूण गुणवत्ता इतर शहरांच्या तुलनेने वाढणार आहे. त्यामुळे या मालमत्ता इतर शहरांपेक्षा अधिक विश्वासार्ह आणि विधिग्राह्य मानल्या जातील. याचा फायदा नागरिकांना होणार आहे. त्याचबरोबर पालिकेची संगणक प्रणाली ही सर्वात युजर फ्रेंडली बनवणार असून नागरिकांना कर भरणे, त्याचा डिस्काउंट घेणे आणि अद्यवायत माहिती मिळणे यासाठी काहीच कष्ट घ्यावे लागणार नाही. कर संकलन कार्यालयात हेलपाटे मारणे हे इतिहासजमा करण्याचे आमचे लक्ष्य आहे.नीलेश देशमुख सहाय्यक आयुक्त