PCMC: ग्लास स्कायवॉक,प्रकल्प चार हेक्टर परिसरात उभारण्यात येणार – आमदार सुनिल शेळके


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – 21 सप्टेंबर 2023 रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्लास स्कायवॉक प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.हा प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
पीएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.सुमारे 4.84 हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून यामध्ये परिसर विकासासह,भुशी डॅम ते लायन्स पॉईंट रस्ता रुंदीकरण,
१२० मीटर लांब व ६ मीटर रुंद ग्लास स्कायवॉक, लायन्स व टायगर पॉईंट जोडणाऱ्या दरीवरील पूल, झिप लाईन,बंजी जम्पिंग, वॉल क्लायबिंग सारखे साहसी खेळ, 1000 व्यक्तींकरिता ॲम्फी थिएटर, फूड पार्क, वाहनतळ, प्रकाश व ध्वनी शो तसेच पर्यटकांसाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.
या प्रकल्पात पर्यटकांच्या सुरक्षेला आणि पर्यावरणाच्या जपणुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे.
हा प्रकल्प झाल्यास या परिसरात पर्यटकांची वाढ होऊन तालुक्यातील पर्यटन क्षेत्रावर आधारित स्थानिकांचे उद्योग-व्यवसाय आणि रोजगार यामध्ये देखील वाढ होणार आहे.लोणावळा येथील टायगर पॉईंट (Maval)आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक प्रकल्प उभारण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे 333 कोटी 56 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.
मावळ तालुक्यातील निसर्ग संपदा लक्षात घेता या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात.पर्यटन विकास आणि निसर्ग पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सर्वप्रथम 2022 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये (11 मार्च 2022) अर्थमंत्री अजित पवार यांनी लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती
या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल राज्य सरकारचे तसेच सहकार्य केलेले सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व ग्रामस्थांचे आमदार सुनिल शेळके यांनी आभार व्यक्त केले आहेत. आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘पर्यटनाच्या दृष्टीने मावळातील महत्त्वाचा असणारा ग्लास स्कायवॉक या दुरदर्शी प्रकल्पासाठीचा पाठपुरावा यशस्वी झाला आहे.हा प्रकल्प पर्यटकांच्या कुतुहलाचे आकर्षण ठरणार आहे.यामुळे पर्यटकांची वाढ होऊन तालुक्यातील पर्यटनावर आधारित व्यवसाय आणि स्थानिकांचे रोजगार यामध्ये देखील वाढ होणार आहे.’