मलाही कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहीजे….गौतमी पाटील

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

गौतमी पाटील ही मूळची खान्देशातील चोपडा तालु्क्यातील वेळोदे आहे. खान्देशात खरंतर शेती करणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं. गौतमीचे वडील शेतकरी होते. त्यामुळे तिला कोणतं जात प्रमाणपत्र मिळेल? हा तिचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण तिने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपल्याला आणि मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, असं म्हटलं आहे

. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. म्हणजे साहजिक आहे. आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळालेच पाहिजे. मला देखील आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय”, असं गौतमी पाटील म्हणाली आहे.

गौतमी पाटील नेहमी कोणत्या ना कोणक्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी ती तिच्या डान्स स्टेप्समुळे चर्चेत असते, तर कधी तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असते. गौतमीच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी आणि त्या गर्दीत होणारे गोंधळ हे नेहमी चर्चेला कारण ठरले आहेत. तरीही गौतमी ही लाखो तरुणांची चाहती बनली आहे.

तिला सोशल मीडियावर अनेकजण फॉलो करतात. तिच्या डान्सचं कौतुक करतात. याच गौतमीने आता मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमीला सुद्धा मराठा आरक्षण हवं आहे.राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. यासाठी त्यांनी अनेकदा उपोषणदेखील केलंय. मनोज जरांगे हे जालन्याच्या अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसले होते. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याची घटना समोर आली होती.

या लाठीचार्जमध्ये अनेक गावकरी जखमी झाले होते. संबंधित घटनेचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्त पेटला. सरकारकडून सध्या निजामकालीन कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरु आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कायदेशील लढाई लढण्याचं काम सरकारकडून सुरु आहे. या दरम्यान

Latest News