पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीच्या वार्षिक परिषदेस प्रारंभ.*दृष्टी वाचविल्याने सामाजिक प्रगतीस हातभार :डॉ. रमण गंगाखेडकर

*पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीच्या वार्षिक परिषदेस प्रारंभ…*दृष्टी वाचविल्याने सामाजिक प्रगतीस हातभार :डॉ. रमण गंगाखेडकर

*पुणे :पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीची ‘पी.ओ.एस. स्पेक्ट्रम २०२३’ या १६ व्या वार्षिक परिषदेस पुण्यात प्रारंभ झाला.दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल शेरेटन ग्रँड येथे या दोन दिवसीय परिषदेचे उदघाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर तसेच डॉ.संतोष होनावार,डॉ.संतोष अगरवाल यांच्याहस्ते झाले.

मुख्य विश्वस्त डॉ. प्रकाश मराठे, डॉ.मुकेश परियानी,डॉ राधिका परांजपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.परिषदेत नेत्ररोग,नेत्र शल्यचिकित्सा,आधुनिक तंत्रज्ञान अशा अनेक विषयावर मार्गदर्शन सत्रे ,विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे . संशोधनपर निबंध सादर करण्यात येणार आहेत. पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मंदार परांजपे,सचिव डॉ. सागर वर्धमाने,खजिनदार डॉ.पंकज बेंडाळे यांनी स्वागत केले

.डॉ शिल्पा पाटील, डॉ. श्रद्धा सातव यांनी सूत्र संचालन केले.उदघाटन सत्रात डॉ.अरविंद लाभशेटवार यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.ते गेली ४५ वर्षे नेत्रशल्य चिकित्सा क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ आशा केळकर पुरस्कार देवून डॉ संतोष भिडे यांचा गौरव करण्यात आला.

डॉ .मधुसूदन झंवर पुरस्कार देवून डॉ .अपर्णा वैद्य यांचा गौरव करण्यात आला. डॉ .शुभदा प्रभूदेसाई पुरस्कार डॉ. विश्वास येवले यांना प्रदान करण्यात आला.साहेबराव – सत्यवती मदान पुरस्कार कै.डॉ. अनिरुद्ध जोशी यांना मरणोत्तर देण्यात आला

. डॉ .शिल्पा जोशी यांनी तो स्विकारला.डॉ.जठार पुरस्कार डॉ.जेकब यांना देण्यात आला. भित्तीपत्रके, छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचादेखील सत्कार करण्यात आला.’मिसयूज ऑफ आय ड्रॉप्स ‘या माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले.

वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. मोनिका निंबाळकर यांनी त्याचे संपादन केले.*दृष्टी वाचविल्याने सामाजिक प्रगतीस हातभार :डॉ. रमण गंगाखेडकर*डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले,

‘ नेत्र रोगांवर उपचार झाल्याने,दृष्टी सुधारल्याने जग सुंदर दिसते . रुग्णांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याचे काम नेत्ररोग तज्ज्ञांकडून होतात. रुग्णांची दृष्टी वाचविल्याने वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीला हातभार लागतो.नेत्ररोगांचे लवकर, अचूक निदान होणे त्यासाठी आवश्यक आहे

. दृष्टी कमी झाल्यावर तपासणी केल्यास नेत्ररोगाबरोबर इतर रोगांचेही निदान होऊ लागले आहे. आर्टीफिशियल इंटेलिजन्स नंतर निदान प्रक्रियेत आणखी क्रांती होणार आहे. मोबाईलच्या अती वापराने डोळ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांवर जागृती केली पाहिजे

Latest News