PMT मधील वृध्द नागरीक,महिलांना लुटाणाऱ्या सराईत आरोपीस अटक,सहकारनगर पोलीसांची कारवाई

PMT मधील वृध्द नागरीक व महिलांना लुटाणाऱ्या सराईत आरोपीस अटक,सहकारनगर पोलीसांची कारवाई

पुणे (ऑनलाईनपरिवर्तनाचा सामना )उत्तर प्रदेश या राज्यातुन येवुन पुण्यात राहुन पीएमटी बसमध्ये प्रवास करणा-या वृध्द नागरीकांना व महिलांना हेरुन हेरुन त्यांचे सोन्याचे दागीने, मोबाईल, पर्स चोरणाऱ्या सराईत आरोपीस सहकारनगर पोलीसांनी केली

शिताफीने अटक केली आहें श्रीमती जिजाबाई लक्ष्मण कदम, वय ७२ वर्षे, धंदा गृहीणी, आंबेगाव खुर्द जांभुळवाडी पुणे

पुणे सातारा रोडवरील प‌द्मावती बसस्टॉप ते बालाजीनगर असा पीएमटी बसमध्ये बसुन प्रवास करीत असताना आहिल्यादेवी चौकात त्यांचे हातातील २ तोळे वजनाची ४०,०००/-रुपये किमतीची सोन्याची बांगडी लोखंडी कटरच्या सहाय्याने जबरदस्तीने तोडुन चोरी करुन पळून गेला होता

पीएमटी बसमध्ये चोऱ्या करणारा मुळचा उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असलेला व सध्या कोंढवा भागात राहणारा सराईत गुन्हेगार १) चांदवावु अलीहुसेनशेख वय ३० वर्षे रा.स.नं.४२, बेचाळीस चौक अलीभाई लेडीज टेलर मागे, कोंढवा खुर्द पुणे. मुळ रा.गाव गौरवकाला पोष्ट महमदपुर ता. कैरनलगड जि. गोंडा राज्य उत्तर प्रदेश यास गस्तीवर असलेले पोलीस हवालदार सुशांत फरांदे व महेश मंडलीक यांनी पाठलाग करुन अटक केली आहें

त्याचे विरुध्द श्रीमती जिजाबाई कदम यांनी फिर्याद दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद दाखल केला आहें

दाखल गुन्हयाचा तपास मा. सुरेंद्र माळाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे व मा. संदीप देशमाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक राहुल खंडाळे व तपास पथकाचे सुरु केला.

आरोपी नामे चांदबावु शेख याचे अंगझडतीमध्ये त्याने फिर्यादी यांची जबरदस्तीने चोरलेली ४०,०००/-रुपये किमतीची सोन्याची बांगडी व एक १००/- रुपये किमतीचे लोंखंडी कटर जप्त केले आहे.

त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेवुन त्याचेकडे अधिक तपास करता त्याने दोन ते आडीच महिन्यापुर्वी एक महिलेची पीएमटी बसमध्ये बालाजीनगर येथे पर्स चोरुन त्यामधील २५,०००/- रुपये किमतीचे अर्ध्या तोळयाचे कानातील टॉप्स व २०००/-रुपये चोरल्याची माहिती दिली.

सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २६८/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असुन त्याचे कोंढवा येथील राहते घरातुन २५,०००/-रुपये किमतीचे अर्ध्या तोळयाचे कानातील टॉप्स जप्त करण्यात आले आहेत.

आरोपीस पकडुन सहकारनगर पोलीस स्टेशनकडील १) सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२६८/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे व २) सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३५६/२०२३ भादवी कलम ३९२ प्रमाणे दोन गुन्हे उघडकीस आणुन ६५,०००/-रुपये किमतीचे सोन्याचे दागीने जप्त केले आहेत.

तसेच पोलीसांमार्फत महिला व वृध्द नागरीक यांना अवाहन करण्यात येते की, सार्वजनीक बसमधुन प्रवास करताना सतर्कता बाळगुन काहीही संशयास्पद प्रकार आढळुन आल्यास पोलीस कंट्रोल रुम नंबर ११२ अथवा महिला हेल्पलाईन नंबर १०९१ यावर तात्काळ मदतीसाठी संपर्क साधावा.असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहें

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार सुशांत फरांदे, महेश मंडलिक, बजरंग पवार, नवनाथ शिंदे, अमोल पवार, निलेश शिवतरे, भुजंग इंगळे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ यांनी केली आहे.

Latest News