कलर्स ऑफ राग’ कार्यक्रमात रंगले रसिक !… भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

IMG-20231230-WA0405

‘कलर्स ऑफ राग’ कार्यक्रमात रंगले रसिक !… भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘कलर्स ऑफ राग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम डॉ.कल्याणी बोंद्रे यांनी सादर केला. हा कार्यक्रम शनीवार, ३० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १९८ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.

आणि कलाकारांचा सत्कार केला.डॉ. कल्याणी बोंद्रे यांनी खयाल,बंदिश,तराणा,गझल,सुफी आणि भक्तिसंगीत सादर केले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.त्यांना मोहन पारसनीस(तबला),संतोष अत्रे(हार्मोनियम), प्रीयंवदा बावडेकर (तानपुरा ) यांनी साथसंगत केली.निवेदन अरविंद बोंद्रे यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात अनवट अमृत वार्षिणी या रागातील ‘आज शुभ दिनी अमृत बससे अज मोरे अंगना ‘ ही बंदीश ने झाली. यानंतर राग बागेश्री मधील ‘ छेड करत नंदलाला ‘ ही बंदीश, त्यानंतर तराना सादर केला. हमीर रागातील कथक परंपरेतील ठुमरी ‘ सब बन ठन आयी श्याम प्यारी ‘ ,

गझल ‘सलोना सा सजन है और मै हूँ ‘ तसेच अमीर खूस्रो यांच्या रचना ,सूफी संगीत सादर केले. संत जनाबाईंचा अभंग ‘ संत भार पंढरीत ‘ सादर झाला.कार्यक्रमाची सांगता ‘ जो भजे हरी को सदा ‘ या भैरवी ने झाली

Latest News