महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती च्या वतीने विविध मागण्यांसाठी विधानभवन समोर उपोषण सुरु


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- )
सन 2021, सन 2022 आणि सन 2023 मध्ये महाज्योती संस्थेच्या वतीने देण्यात येणारी संशोधन फेलोशिप सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून मिळावी, या मागणीसाठी यापूर्वी मुंबई येथे आझाद मैदान आणि हिवाळी अधिवेशानादरम्यान नागपूर येथे अद्नोलन करण्यात आले.
याबाबत 14 डिसेंबर 2023 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाली. हायपॉवर समितीने फेलोशिप बाबत पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या.
भटके विमुक्त (व्हीजेएनटी), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) यातील ( Pune )महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे येथील विधानभवन येथे उपोषण आंदोलन सुरु केले आहे.
मंगळवारी (दि. 2) सकाळी महात्मा फुले वाडा येथून लॉंगमार्च काढून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.तरीही 24 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे पात्रता परीक्षा घेण्यात आली.
दरम्यान या पात्रता परीक्षेत सन 2019 साली सेट परीक्षेत आलेली प्रश्न पत्रिकाच पात्रता परीक्षेसाठी देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासन पुन्हा 10 जानेवारी रोजी ही परीक्षा घेत आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.सन 2023 साली महाज्योती संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती मागील वर्षाच्या निकषाप्रमाणे अर्ज केलेल्या सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना फेलीशीप जाहीर करावी.
पीएचडी साठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी झालेल्या दिनांकापासून फेलोशिप द्यावी. बार्टी ( BARTI ) प्रमाणे चाळणी परीक्षा रद्द करून सर्वांना सरसकट संशोधन फेलोशिप, पीएचडी अदा करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.