पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा मद्यधुंद अवस्थेत सोसायटीत धिंगाणा…. 

पुणे :  ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-वानवडी भागात मद्यधुंद तरुणीने सोसायटीच्या आवारात गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. मद्यधुंद तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याची माहिती मिळाली असून, अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.नववर्षाच्या मध्यरात्री वानवडीतील एका सोसायटीत मद्यधुंद तरुणी आली. तिने सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

सुरक्षारक्षकाच्या केबीनजवळ ठेवलेले टेबल तिने फेकून दिले. तरुणीचा आरडाओरडा ऐकून नागरिक जमा झाले. मद्यधुंद अवस्थेतील तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. या घटनेचे चित्रीकरण सोसायटीतील कॅमेऱ्यांनी केले आहे. गोंधळ घालणारी तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती मिळाली आहे.

Latest News