‘इनक्रेडीबल सिव्हिल सर्व्हिस ऍकॅडमी’ चे उदघाटन

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

पुणे शहरातील मागास,अल्पसंख्याक विद्यार्थी मूळ प्रवाहात आणण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप तर्फे ‘इनक्रेडीबल सिव्हिल सर्व्हिस ऍकॅडमी ‘ ची स्थापना करण्यात आली असून उद्घाटन कार्यक्रम सावित्रीबाई फुले जयंती दिनी म्हणजे दिनांक ३ जानेवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता पार पडला.सर्व्हे नं.५९/१,शिवनेरीनगर,कोंढवा खुर्द येथे एकेडमीचे उद्घाटन आय.एफ. एस.अधिकारी ए.के.खान,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद जावडेकर यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपआयुक्त डॉ.कल्पना बळीवंत, समाज विकास विभागाचे लाईट हाऊस चे पदाधिकारी ,सलिम मुल्ला, सुल्तान खान, कुमेल रजा,अशोक सोनवणे,अबुल कलाम शिकलगार,अली सय्यद,जमादार,पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका तब्बसूम शेख,ज्यूपिटर इंग्लिश मिडीयम स्कूलचे शिक्षीका ,फिदाये मिल्लत,दारूल उलूम ब्लू बर्ड शाळेचे विद्यार्थी ,पालक वर्ग उपस्थित होते.ए के खान, शरद जावडेकर , जाहिद शेख,सलिम मुल्ला, सुल्तान खान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अशोक सोनवणे यांनी आभार मानले.या संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षा,युपीएससी,एमपीएससी, पोलीस भरती व इतर सरकारी नोकरीसाठीचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती संस्थापक असलम इसाक बागवान यांनी दिली.

Latest News