गांधीभवन येथे खादी प्रदर्शनास प्रारंभ

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघाच्या वतीने गांधीभवन मैदान ,कोथरूड येथे खादी प्रदर्शन, विक्रीस ३ जानेवारी रोजी प्रारंभ झाला. हे प्रदर्शन ७ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
प्रदर्शनात विविध प्रांतातील वेगवेगळ्या दर्जाच्या शुद्ध खादी वस्त्रे, तयार कपडे उपलब्ध करण्यात आली आहेत. नव-नवीन डिझाईन चे शर्ट, गांधी टी- शर्ट, कुर्ता, पायजामा, जॉकेट आहेत.लुंगी, टॉवेल, शर्टिंग व कोटिंग उपलब्ध आहे.साड्यांमध्ये खादी साडी, कोसा साडी प्रदर्शनात आहे.ड्रेस मटेरियल, लेडिज टॉप, रुमाल, बेडशीट, खेस चादरी, स्प्रे-दरी, उलन शॉल, कोसा शॉल व लेडीज बॅग यांचा समावेश या प्रदर्शनात आहे.सुती खादी वर २० टक्के सूट तर कोसा कापड वर १५ टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. किशोर फुलंबरकर यांनी ही माहिती दिली.अधिक माहितीसाठी संपर्क ७८७५०८६४१८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन,एड.संतोष म्हस्के,अरुणा तिवारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Latest News