IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्यापोलीस महासंचालक पदावर नियुक्ती….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना रश्मी शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबई येथे कुलाबा आणि पुणे शहरात एक असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही कारवाई करण्यात आली होती.राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुण्यातील गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी ‘सी समरी रिपोर्ट’ न्यायालयात सादर केला होता. सी समरी रिपोर्ट म्हणजे ‘गैरसमजुतीने दिलेली फिर्याद’. अशा प्रकारचा रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात सादर केला होता.तर मुंबई येथील प्रकरणात त्यांच्या विरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारने नकार दिला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील दोन्ही एफआयआर रद्द केले होते. त्यामध्ये शुक्ला यांना क्लीन चिट मिळाली होती. दरम्यान, रश्मी शुक्ला दिली येथे प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या.फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चिट मिळालेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या ( DGP Rashmi Shukla) पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या. पोलीस महासंचालक रजनीश सेठ 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. दरम्यान, आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस प्रमुखांचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता. अखेर चार दिवसांनी रश्मी शुक्ला यांच्या नावाची घोषणा करत त्यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.रजनीश सेठ यांच्यानंतर पोलीस महासंचालक पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने राज्य शासनाला सेवा ज्येष्ठतेनुसार तीन नावांची यादी दिली होती. त्यामध्ये रश्मी शुक्ला यांचे नाव सर्वात आधी होते. मात्र रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलीस आयुक्त व्हायचे असल्याची चर्चा झाली. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी रजनीश सेठ यांच्या नंतर आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता. अखेर चार दिवसांनी रश्मी शुक्ला यांच्या नावाची घोषणा करत त्यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत.