आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा जुमानत नाही, हे आजच्या त्यांच्या ”नार्वेकर” निकालातून दिसून आलं…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
निकाल आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहे की, ”मूळ राजकीय पक्ष संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला निर्णय लोकशाहीची हत्या करणारा आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेतते पुढे म्हणाले, भाजपाला आपलं संविधान बदलायचे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान घ्यायचा आहे, ते स्पष्ट झालं अनेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते? लोकशाहीमध्ये या सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल.न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत? काय चौकट दिलेली आहे? त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे? अथवा काय चौकशी करायला पाहिजे? हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. ते संपूर्णपणे पायदळी तुडवले. आमच्या मागे महाशक्ती आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा जुमानत नाही, हे आजच्या त्यांच्या (राहुल नार्वेकर) निकालातून दिसून आलं आहे, असं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालानंतर उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सुप्रीम कोर्टात हा निर्णय टिकणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.पत्रकार परिषद घेत त्यांनी नार्वेकर यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ”पक्षांतर कसं करावं आणि त्याचा मार्ग कसा आहे, हे त्यांनी आज दाखून दिलंते म्हणाले, ”त्यांनी (राहुल नार्वेकर) स्वतः दोन-तीन पक्ष बदलली आहेत. यामुळे त्यांनी आज त्यांच्या भावी वाटचालतील अडथळा आज दूर करून घेतला असेल. आज पर्यंत आपण जे मनात आलो आहोत की, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात, ते एक परिमाण ठरलं जातं.”