Pune: एक लाख पुणेकर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी ”रामरक्षा पठण” करणार- हेमंत रासने

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- रासने म्हणाले, भक्तिसुधा फाउंडेशन आणि समर्थ व्यासपीठ या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीरामासाठी नमन, देशासाठी समृद्धी आणि सैनिकांसाठी बल अशा तीन संकल्पांसाठी तीन वेळा पठण केले जाणार आहे.अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने (Pune)एक लाख पुणेकर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या रविवारी सकाळी साडेसात वाजता रामरक्षा पठण करणार असल्याची माहिती निमंत्रक हेमंत रासने यांनी कळविली आहे.स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या आश्रमातील शिष्य रामरक्षा पठणाचे (Pune)नेतृत्व करणार आहेत. लक्ष्मणाचार्य रचित रघुपती राघव राजाराम या मूळ पदाचे प्रथमच सादरीकरण केले जाणार आहे. आशिष केसकर यांचे संगीत असून चारुदत्त आफळे गायन करणार आहेत. अभिनेते राहूल सोलापूरकर रामजन्मभूमीचा इतिहास सांगणार आहेत. अधिकाधिक पुणेकरांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहनही रासने यांनी केले आहे.

Latest News