गीतरामायणावर रविवारी नृत्याविष्कार

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरात होणाऱ्या श्री राम प्राणप्रतिष्ठतेचे औचित्य साधून त्या विशेष दिनाच्या पूर्वसंध्येला, दि.२१ जानेवारी रोजी गीत रामायणातील काही निवडक गीतांवर नृत्याविष्काराचा ‘ गीतरामायण ‘ कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला आहे . शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था, मित्र फाऊंडेशन आणि अलाईव्ह कल्चरल्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा विनामूल्य कार्यक्रम होत आहे.अकरा संस्थांचा या कार्यक्रमात सहभाग आहे.कलावर्धिनी, मनिषा नृत्यालय,आकृती नृत्यालय, कलाश्री नृत्यालय, कथक पाठशाला, स्वरदा नृत्यालय, नृत्यप्रेरणा, कलानुभूती, नृत्यभारती, समर्चना, सूक्ष्मी कथक स्टुडीओ,रूपक नृत्यालय या संस्था सादरीकरण करतील.
स्व. ग. दि. माडगूळकर लिखित ,सुधीर फडके यांचे संगीत असलेल्या गीत रामायणावर आधारित हा विशेष नृत्य सादरीकरण कार्यक्रम आहे.संकल्पना अजय धोंगडे यांची असून निवेदन नीरजा आपटे यांचे आहे. रविवार, दि. २१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वा केशवबाग, डी पी रोड, राजारामपुलाजवळ, कर्वेनगर येथे हा कार्यक्रम होणार आहे.प्रवेशिका विनामूल्य असून हॉटेल व्हरांडा(मेहेंदळे गॅरेज) ,अग्रज फूड(ताथवडे उद्यानाशेजारी, कर्वेनगर )येथे उपलब्ध होतील.