सध्याच सरकार ईडी (ED) आणि (CBI) सीबीआयचं सरकार – काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथ

पुणे :  ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढविणार याबाबत सर्व पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा सुरू आहेत. त्या संदर्भात येत्या काळात लवकरच घोषणा केली जाईल. तसेच महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व ४८ जागा निवडून येतील. सध्याचं राज्य सरकार हे जनतेने निवडून दिलेलं नाही. ते ईडी आणि सीबीआयचं सरकार असल्याचं सांगत चेन्नीथला यांनी भाजपवर निशाणा साधला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातारासहअनेक भागांतून लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू आहे. याबाबत रमेश चेन्नीथला यांना प्रश्न विचारताच, ते म्हणाले, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा.

चेन्नीथला यांनी असे म्हणताच त्यांच्या बाजूला बसलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट हातच जोडले. राज्याच्या कोणत्याही भागातून पृथ्वीराज चव्हाण हे निवडणुकीसाठी उभे राहिल्यास ते निवडून येतील, असा विश्वास देखील चेन्नीथला यांनी यावेळी व्यक्त केला

.शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आणि आमदार रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजीत कदम, आमदार रविंद्र धंगेकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीपूर्वी पत्रकार परिषद झाली.

तसेच ते पुढे म्हणाले की, सध्याचं केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या विरोधात असून महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलत नाही. पण आम्ही इंडिया आघाडी देशभरात सर्व सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असून लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश निश्चित मिळणार आहे

Latest News