‘दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा’ विषयावर व्याख्यानास प्रतिसाद

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दलाच्या वतीने दि.२० जानेवारी रोजी माजी पोलीस उपायुक्त विवेक देशपांडे यांचे ‘दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . गांधी भवन सभागृह,कोथरूड येथे हे व्याख्यान झाले.

डॉ कुमार सप्तर्षी, डॉ उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, प्रशांत कोठडिया, संदिप बर्वे, जांबुवंत मनोहर, नीलम पंडित उपस्थित होते.

विवेक देशपांडे म्हणाले,’सलग वर्षी झालेल्या बॉम्ब स्फोटातून आपण काही शिकलो नाही. निष्काळजी पणा चा फटका आपल्याला बसत आला आहे.अमेरिका सारख्या देशात एक हल्ला वगळला तर असे हल्ले झाले नाहीत. बॉम्ब स्फोट मालिकेबाबत सामूहिक झोपेतून जागे होण्याची गरज आहे. दहशतवाद हा दीर्घ कालीन धोका असून त्यावर उपाय योजना करण्याची गरज आहे.

परदेशात फ्रान्स चे राष्ट्राध्यक्ष सुध्दा हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणतात. मात्र, मुंबई तील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रसंगी तत्कालीन पोलीस आयुक्त कार्यालयात बसून सूचना देत होते. दहशत वादाला तोंड देण्यात हा फरक आहे.

हेरगिरी, वैचारिक घुसखोरी, राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान हे धोके कायम आहेत. या धोक्यापासून देश वाचविणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा होय. वैफल्यातून पाकिस्तान दहशत वादाकडे वळला. काश्मीर आणि खलिस्तान म्हणजे के -२ प्लॅन द्वारे पाकिस्तानला भारताला सतत दहशत वादाच्या दबावाखाली ठेवायचे आहे. चीन कडूनही धोका आहे,त्या बाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.

Latest News