कोकण खेड युवाशक्तीच्या वतीने, गड किल्ला स्वच्छता मोहीम


पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
– पायथ्यापासून ते मंदिर परिसरापर्यंत पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल व खाऊच्या पदार्थाचे रॅपल्स असा अविघटनशील प्लास्टिक गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात आले.
त्याचबरोबर लोकांनी गड किल्ल्यावर फिरताना सोबत आणलेला अन्नपदार्थ व खाऊचा कचरा आपल्या सोबत परत घेऊन जावा असे आवाहन करण्यात आले.
गड परिसरामध्ये अजूनही ऐतिहासिक ठिकाण आणि साहित्य यांची माहिती देणारे फलक पुरातन खात्याद्वारे लावण्यात आलेले नाहीत. याबाबत कोकण खेड युवाशक्ती द्वारे पुरातन खात्यास पत्रव्यवहार केला जाईल.
मोहिमेसाठी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री रुपेश मोरे सचिव संदीप सकपाळ सर कार्याध्यक्ष संतोष कदम उपाध्यक्ष संदीप जाधव सहखजिनदार नंदकुमार महाडिक त्याचबरोबर कार्यकारणीचे सदस्य श्री मधुकर कदम श्री संदीप साळुंखे श्री अभिजीत कदम श्री रोशन चाळके श्री अनिल कोकीकर श्री अरुण यादव, प्रा संदीप कदम श्री सुधीर जाधव त्याचबरोबर स्थानिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.