‘इशरे’ च्या वतीने पुण्यात ३ फेब्रुवारी रोजी ‘ग्रीन कॉन्क्लेव्ह-२०२४’

98

‘डी-कार्बनायझेशन अँड सस्टेनेबिलिटी’ या विषयावर विचारमंथन
………………….
‘सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘आणि निकमार युनिव्हर्सिटी चे आयोजन

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

‘सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘(इशरे) आणि निकमार युनिव्हर्सिटीच्या वतीने १८ संस्थांच्या सहकार्याने ‘एक्सप्लोरिंग डी-कार्बनायझेशन अँड सस्टेनेबिलिटी’ या विषयावर दि.३ फेब्रुवारी रोजी ‘ग्रीन कॉन्क्लेव्ह -२०२४’चे आयोजन करण्यात आले आहे.

निकमार युनिव्हर्सिटी (बालेवाडी) येथे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी ६ या वेळात ही कॉन्क्लेव्ह होणार आहे. ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी -एचसीसी तसेच ‘निकमार’ चे अध्यक्ष अजित गुलाबचंद,प्रसिद्ध वास्तूविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर,योगेश ठक्कर(अध्यक्ष,इशरे सोसायटी),पंकज धारकर(अध्यक्ष,असोचेम),सौरभ दिड्डी (संचालक, बी ई ई), डॉ.अनिल कश्यप(कुलपती,निकमार युनिव्हर्सिटी),डॉ.सुषमा कुलकर्णी(कुलगुरू,निकमार युनिव्हर्सिटी),हबीब खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.अभिनेते सयाजी शिंदे,डॉ हरिहरन,मिली मजुमदार,स्वप्नील जोशी,सुनीता पुरुषोत्तम हे ग्रीन कॉन्क्लेव्ह च्या विविध विषयांवर बोलणार आहेत.कार्बन उत्सर्जन रोखण्यात चांगले योगदान देणाऱ्या १० व्यक्तींना ‘कार्बन मास्टर्स अवॉर्ड्स’ देखील या परिषदेत दिले जाणार आहेत.

‘सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स (इशरे) ‘च्या पुणे चॅप्टर चे अध्यक्ष नंदकिशोर कोतकर,मावळते अध्यक्ष वीरेंद्र बोराडे,सचिव सुभाष खनाडे,कॉन्क्लेव्हच्या संयोजक अंशुल गुजराथी,सुजल शहा (-एडव्होकसी चेयर -अधिवक्ता अध्यक्ष),डॉ.अभिजात अभ्यंकर (अधिष्ठाता,निकमार)यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विकसक,बिल्डर,एम इ पी एफ कन्सल्टन्ट,पीएमसी, आर्किटेक्ट,सल्लागार,अभियंते ,सर्व्हेयर,ग्रीन बिल्डिंग कन्सल्टन्ट,ऊर्जा व्यवस्थापक,एचव्हीसी अँड आर कन्सल्टन्ट,एसी अँड आर प्रोफशनल्स,नागरिक असे एकूण १ हजार प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.

कार्बन प्रदूषण कमी करणे आणि शाश्वत विकास या विषयावर विचारमंथन
…………..
‘ हवेतील कार्बन प्रदूषण कमी करणे,कार्बन कॅल्क्युलेशन मेथडॉलॉजी,पद्धती,डी- कार्बनायझेशन ,एयर क्वालिटी,हेल्थ,प्रॉडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी’ अशा विषयावर चर्चासत्रे या परिषदेत आयोजित करण्यात आली आहेत. या एक दिवसीय कॉन्क्लेव्ह मध्ये सौरभ दिड्डी,आशीष रखेजा,अभिनेते सयाजी शिंदे,डॉ.हरिहरन,मिली मुजुमदार,स्वप्नील जोशी,सुनीता पुरुषोत्तम,मेहेर सिधवा हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.कार्बन उत्सर्जन कसे मोजावे याचे कॅल्क्युलेटर तंत्र शिकवले जाणार आहे.उपाययोजनाही सांगितल्या जाणार आहेत.

बेलिमो,एन्सावियर,आरा,सँक,रेफकूल,एअर केअर,आर्मासेल,फॅब्रिक सॉक्स,रिनोटेक,फाऊंट लॅब यांच्या सहकार्याने ही कॉन्क्लेव्ह होत आहे. आर्किटेक्ट,इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन, जीबीसीआय,सीटीबीएचयू,क्रेडाई,असोचेम जेम,एफ एस ए आय,आयजीबीसी,मेडा,ऑसम,आयपीए,आरएटीए,आयएसएलई या संस्था संयोजनात सहकार्य करीत आहेत.

आचरणातून देणार कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा संदेश !

‘ग्रीन कॉन्क्लेव्ह-२०२४’ या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा संदेश कृतीतून आणि आचरणातून देण्यात येत आहे. पाण्याच्या प्लास्टिक च्या बाटल्या परिषदेत ठेवण्यात येणार नाहीत तर साध्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे.स्वतंत्र वाहनातून प्रतिनिधी परिषदेला येणार नसून ठिकठिकाणाहून ‘कार पुलिंग’ तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय देण्यात आला आहे.परिषदेत कागदाचा कमीत कमी वापर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी फ्लेक्स हे पुनर्वापर करता येतील असेच लावण्यात येणार आहेत.तसेच भोजन व्यवस्थेत देखील निसर्गाची जपणूक करण्याचा विचार (कार्बन फूट प्रिंट)करण्यात येणार आहे.परिषदेत सहभागी होणाऱ्या १ हजार प्रतिनिधी पुढील काळात कार्बन उत्सर्जन रोखण्याची शपथ घेणार आहेत.आगामी काळात पुण्यातील सर्व मोठ्या संस्थांमध्ये जाऊन प्रबोधन करण्यात येणार आहे. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी स्कोप-१,स्कोप-२,स्कोप-३ या पायऱ्या असून त्याकडे लक्ष दिले जात आहे.ही राष्ट्रीय परिषद अशा स्वरूपाच्या कार्यक्रम व्यवस्थापनाचे आदर्श ‘मॉडेल’ ठरेल,असे अंशुल गुजराथी यांनी सांगितले.


Latest News