इंडियन आयडॉल 14 मध्ये गायक अभिजीत भट्टाचार्यने सांगितले, “वादा रहा सनम’ गीत स्व. एस. पी. बालासुब्रमण्यम गाणार होते”


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये ‘अभिजीत चॅलेंज’ या खास भागासाठी सुप्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यला आमंत्रित करण्यात आले आहे. 90 च्या दशकातील हा लोकप्रिय गायक स्पर्धकांना वेगवेगळी आव्हाने देईल, ज्यातील काही गायकाची क्षमता जोखणारी असतील तर काही गंमतीशीर असतील. सर्व स्पर्धक या चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करताना दिसतील.
ओबोमला एक सूफी गाणे सादर करण्याचे आव्हान मिळेल, तर पियुषला एक गाणे गझलच्या शैलीत सादर करण्याचे आव्हान असेल. वैभवला असे एक गाणे सादर करण्यास सांगितले जाईल, जे कुमार सानू आणि अभिजीतने एकत्र म्हटले होते. अंजनाला ‘ये काली काली आंखें’ गाणे दिले जाईल, जे तिने त्याच चालीत पण वेगळ्या ठेक्यात म्हणायचे आहे.
कोलकाताहून आलेल्या अनन्या पालने ‘खिलाडी’ चित्रपटातील ‘वादा रहा सनम’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातील ‘जरा सा झूम लूं मैं’ ही मुळात अभिजीतने गायलेली गाणी सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कुमार सानू तिला दाद देताना म्हणाला, “तुझा आवाज पार्श्वगायनासाठी अगदी तयार आहे.”
अनन्याच्या गायन शैलीने प्रभावित झालेल्या अभिजीत भट्टाचार्यने ‘वादा रहा सनम’ गाण्याविषयी सांगितले की, “हे गाणे मुळात मी म्हणणार नव्हतो. बालासुब्रमण्यम साब हे गाणं गाणार होते. हे गाणे बालासुब्रमण्यम आणि लता जींनी एकत्र सादर करावे अशी संगीतकार जतिन-ललितची इच्छा होती. पण काही कारणाने ते जुळून येत नव्हते. तालमी होऊ शकत नव्हत्या. त्यामुळे मग बालासुब्रमण्यमसोबत अलका याज्ञिक हे गाणे गाईल असे ठरले. त्यानंतर मला सांगण्यात आले की, मला हे गाणे डब करायचे आहे. चंपक जैन जींची ही युक्ती होती की, मी गाणे डब करायचे आणि मग पुढचे ठरवायचे. शेवटी, हे गाणे माझ्याच आवाजात ठेवण्यात आले.”
तर मग, या शनिवारी, बघायला विसरू नका, इंडियन आयडॉल सीझन 14 रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!