धनगर समाजाच्या युवकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली, यावेळी रोहित पवार यांचा एकतरी कार्यकर्ता गेला होता का?


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समावून घेण्याबाबत राज्य सरकारने आध्यादेश सादर केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी रोहित पवार यांनी सरकारला अनेकदा धारेवर धरलं होतं. यावर आता ओबीसी नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अंगामध्ये रक्त नाही, असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.मराठा समाज अनेक महिन्यांपासून आरक्षणाची मागणी करत आहेत. यावर गोपीचंद पडळकर यांनी “गरीब मराठा समाजाला आरक्षणाची मागणी देणार असल्याची भूमिका आम्ही सभागृहामध्ये आणि सभागृहाबाहेर मांडली आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजानं सर्व लढाईसाठी सज्जा व्हावं”, असं गोपीचंद पडळकर अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी रोहित पवार यांनी सरकारकडे मागणी केली. यावर आता गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांना खडे बोल सुनावलं आहे. ते म्हणाले की, “धनगर समाजाच्या युवकांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली होती, यावेळी रोहित पवार यांचा एकतरी कार्यकर्ता गेला होता का? आझाद मैदानावर मराठा आरक्षणाचा प्रश्न आल्यावर रोहित पवार (Rohit Pawar) गेले, रोहित पवार यांच्या शरीरामध्ये रक्त नाहीतर जातीयवाद वाहतोय”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.धनगर आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकर यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे, “धनगर आरक्षणासाठी मी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेतली. धनगर आरक्षण कोर्टातून येणार आहे. धनगर आरक्षणाबाबत १२ फेब्रुवारीला अंतिम निर्णय होणार आहे. १५० हून अधिक पुरावे कोर्टामध्ये दिले आहेत. या महिन्यात कोर्टातून आरक्षणाचा निर्णय लागेल”, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना संबोधीत केलं.अजित पवार गटाचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी 17 नोव्हेंबरला झालेल्या ओबीसी मेळव्याच्या पूर्वीच आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत विचारलं असता पडळकर उत्तरले आहेत. ते म्हणाले, “छगन भुजबळ यांना राजीनामा मागणाऱ्यांसाठी ही चपराक आहे”, असं म्हणत पडळकरांनी पवारांना सुनावलं.मराठा आरक्षणावरून मराठा बांधवांनी ओबीसी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत सरकारकडे आरक्षणाची मागणी केली आहे. यावर आता सरकारने आध्यादेशही काढला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे सुपूर्त केला. यामुळे मराठा समाजानं जल्लोष केला. दरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील मराठा आरक्षणासाठी सरकारकडे मागणी केली यावरून आता ओबीसी नेते गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार यांच्यात तु तु आणि मे मे अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे