अशोक चव्हाण यांचा राजीनामा म्हणजे,,,, भाजपाची ताकद क्षीण ,अंबादास दानवे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- अशोक चव्हाण यांचा राजीनामा म्हणजे आमच्यासाठी धक्का आहे, असं अंबादास दानवे म्हणाले. तसंच त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. अशोक चव्हाण यांचा राजीनामा म्हणजे आमच्यासाठी धक्का आहे. भाजपाची ताकद क्षीण झालेली आहे म्हणून भाजप असं काम करत आहे. म्हणून त्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांची गरज भासते आहे.

अशोक चव्हाण ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत हे मानले पाहिजे. कोणतीही आघाडी किंवा पक्ष एका व्यक्तीवर चालत नसतो. कोणाच्या आल्याने आणि गेल्याने पक्ष संपत नसतो अशी अनेक उदाहरणं आहेत. भाजप ही 2 वरून 300 वरती गेली आणि काँग्रेस इंदिरा गांधींच्या काळात नेस्तनाभूत होऊन पुन्हा उभी राहिली आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

Latest News