काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढते ,नाना पटोले

मुंबई =ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

चव्हाण यांच्यासारखा मोठा नेता काँग्रेसमधून बाहेर पडल्याने पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘ आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे’ असे त्यांनी लिहीले आहे‘ काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. असं मत काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे

कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू

काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय भूकंप झाला. सोमवारी सकाळी राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण थोड्या वेळासाठी नॉट रिचेबल होते. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला असून काँग्रेस वरिष्ठांशी बोलण्यासाठी नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना…

Latest News