लोकशाहीत निवडणुकीला उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार – शरद पवार

sunetra-pawar-1

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य लढतीवर शरद पवार प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाहीत निवडणुकीला उभं राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी अधिकार गाजवत असेल तर तक्रार करण्याची गरज नाही. आपली भूमिका लोकांसमोर मांडावी

, आपण काय काम केलं हे सांगितलं पाहिजे. अनेक संस्था आम्ही उभ्या केल्या. 50 वर्षापासूनच्या या संस्था आहेत. आम्ही ज्या काळात या संस्था स्थापन केल्या, त्यावेळी आज आरोप करणाऱ्यांचं काय वय होतं याचं त्यांनी कॅलक्युलेशन करावं. त्याचा विचार करावा. तुम्ही जरूर उभं राहा. तो तुमचा अधिकार आहे, असं शरद पवार म्हणाले.

धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीत जेवढा कालखंड गेलाय त्याच्या किती तरी वर्षापासून जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीत काम करत आहेत. आव्हाडांनी राज्यच नाही तर देशपातळीवरही काम केलंय. आमदार आणि मंत्री राहिले आहेत. त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे. त्यामुळे आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे.

आव्हाडांनी काय बोलावं याचं मार्गदर्शन करण्याची अन्य लोकांची गरज नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला यावेळी त्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला केला. साधी सरळ गोष्ट आहे. भाजपचं संसदेत बहुमत आहे. सरकारने विरोधी पक्षाशी चर्चा करावी. धनगर, मुस्लिम आणि लिंगायतांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारने आणला तर त्याला विरोधक सहकार्य करतील.

असं असताना वेगळी भूमिका कोर्टात मांडणं म्हणजे या घटकांना आरक्षण न देण्याचं धोरण आहे. त्यामुळेच या वर्गावर अन्याय करणारा निकाल लागला आहे

Latest News