मी निवडणूक लढणार,आणि निश्चितपणे जिंकून येणार – आढळराव पाटील

khole

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)

म्हाडाच्या पदासाठी लोकसभा सोडणाऱ्यातला मी नाही, शिवाजी आढळराव पाटलांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. आढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन, लोकसभेच्या रिंगणातुन बाहेर तर काढण्यात आलं नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच महायुतीकडून शिरूर लोकसभा कोण लढणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, या चर्चा शिवाजी आढळराव पाटलांनी खोडून काढल्या आहेत.

, म्हाडाचं अध्यक्षपद ही मोठी बाब आहे, असं वाटत नाही. मी करवीर नगरीत आलो आणि म्हाडाचे अध्यक्ष पद मिळालं हा मी योगायोग समजतो.

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घराची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. ही जबाबदारी चांगली पेलणार असल्याची खात्री असल्याचं ते म्हणाले. लोकसभेच्या उमेदवारीचा आणि या म्हाडाच्या अध्यक्षपदाचा काहीही संबंध नाही. मी लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहणार हे ठरलं आहे. त्यात कोणातही बदल करण्यात आला नाही. आपला मतदार संघ नीट सांभाळायचा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे

. त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे आणि निश्चितपणे जिंकून येणार असल्याचा विश्वास आढळराव पाटलांनी व्यक्त केला आहे.

Latest News