तुम्हीही जातनिहाय गणना करा. ओबीसी किती आहेत ते एकदा समोर येउद्या- छगन भुजबळ


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सर्टिफिकेटमध्ये खाडाखोड करण्यात आली आहे. कुणबीकरण थांबवलं पाहिजे. आता मराठा आरक्षण दिलं आहे, आता कुणबी कशाला पाहिजे? सगेसोयरे आले पाहिजे, अशी मागणी आहे. मात्र ते नियमात तर बसलं पाहिजे. आमचा सगेसोयरे या शब्दालाही विरोध आहे. हा तर्क बेकायदेशीर आणि संविधानिक आहे आणि कोर्टाच्या विरोधात आहे. आरक्षण मिळालं नाही तर शिक्षणात सुविधा देण्याचा जीआर काढला होता. त्यानुसार मग सर्व समाजाला या सुविधा द्या”, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. “झारखंडने जातनिहाय जनगणना करण्याचा आदेश दिला आहे. तुम्हीही जातनिहाय गणना करा. ओबीसी किती आहेत ते एकदा समोर येउद्या”, असंही भुजबळ सरकारला उद्देशून म्हणाले. जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे ते ओबीसी समाजातल्या मुलांना मिळालं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आरक्षणाचं विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झालं आहे. त्यामुळे आता मराठा समाजासाठी स्वतंत्र 10 टक्के आरक्षणाचा कायदा झाला आहे. मराठा आरक्षण विधीमंडळात मंजूर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. मनोज जरांगे यांच्याकडून आपल्याला धमकी दिली जात आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. “शिवीगाळ, दादागिरी आणि रोज धमक्या सुरू आहेत. मला रोज टपकावण्याची भाषा केली जाते. मनोज जरांगेंनी कलेक्टर आणि एसपींना शिवीगाळ दिली आहे. वरती छत्रपतींचा पुतळा आणि त्याच्याखाली बसून शिवीगाळ केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. अजय महाराज हे तुकाराम महाराजांचे भक्त आहेत. ते मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत. ते जरांगेबरोबर काम करत होते, मी संत वैगरे काही मानत नाही. पण त्यांचा अपमान केला आहे”, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे“वरती गोधडी पांघरून घेतो आणि आतमध्ये सर्व चालू आहे, मोबाईल बघतो”, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. “आज सर्वांना कळालं पाहिजे, हा जरांगे काय आहे ते. कायदेशीर कारवाई तर करणारच. माझ्यावर कुणीही हल्ला केला तरी या जरांगेला आत घेतलं पाहिजे