पिंपरी चिंचवड महापालिकेचा ८ हजार ६७६ कोटी ८० लाख रूपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर


पिंपरी चिंचवड महापालिकेचा ८ हजार ६७६ कोटी ८० लाख रूपयांचा अर्थसंकल्प स्थायीपुढे सादरपिंपरी (ऑनलाईन परिवर्तननाचा सामना ):-पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मूळ ५ हजार ८४१ कोटी ९६ लाख रूपये आणि केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ८ हजार ६७६ कोटी ८० लाख रूपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीला आज (दि.२०) सादर केला. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आलेली नाही.या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला. प्रशासकांनी अर्थसंकल्पाला तात्काळ मान्यता दिली. महापालिकेचा हा ४२ वा अर्थसंकल्प आहे. तर, आयुक्त सिंह यांचा दुसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप उपस्थित होते.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात र.रु. ५२९७ कोटी (शिल्लकेसह) इतकी रक्कम जमा होईल हे अपेक्षित धरुन सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मा. स्थायी समिती मार्फत मा. महापालिका सभेपुढे सादर केले होते. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात र.रु. ५८४१ कोटी (आरंभिच्या शिल्लकेसह) उत्पन्न अपेक्षित आहे. व त्यात प्रत्यक्षात खर्च र.रु. ५८३२ कोटी होईल व मार्च २०२५ अखेर र.रु. ९ कोटी इतकी शिल्लक राहील.रस्ते विकसित..पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे ६१ किलोमिटर लांबीचे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यात वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर, चिखली, जाधववाडी, बोहाडेवाडी, मोशी, चन्होली, तळवडे, दिघी, डुडुळगाव, वडमुखवाडी, कुदळवाडी या भागातील रस्ते विकसित करणेचे नियोजन आहे.सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प..चिंचवड येथे सिटी सेंटर, मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारणे, नेहरूनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम विकसित करण्यात येणार आहे.पुल उभारणी..मुळा नदीवर सांगवी – बोपोडी येथे पुल उभारणी, पिंपरी येथील डेअरी फार्म येथे रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधणे, सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सब वे बांधण्यात येणार आहे. मामुर्डी सांगवडे येथे पवना नदीवर पुल उभारण्यात येणार आहे. मोठ्या इमारती..मोशी येथे ७०० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. आकुर्डी गावठाण येथे वारकरी भवन उभारण्याचे नियोजन केले आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर समोर पिंपरी चिंचवड महापालिकेची नवीन मुख्य प्रशासकीय इमारत उभारण्यात येत आहे.अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये..!• महापालिकेच्या विकास कामासाठी १८६३ कोटी तरतूद• आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी १९० कोटी• स्थापत्य विशेष योजनांसाठी १०३१ कोटी ७९ लाख• शहरी गरिबांसाठी १८९८ कोटी• महिलांच्या विविध योजनांसाठी ६१ कोटी ५८ लाख• दिव्यांग कल्याकणारी योजना ६५ कोटी २१ लाख• पाणीपुरवठा २६९ कोटी ८९ लाख• पीएमपीएमएलसाठी २६९ कोटी ८९ लाख• भूसंपादनकरिता १०० कोटी• स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी रुपये तरतूद.