महाराष्ट्रातील सहा जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड….

Untitled-1-1

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

काँग्रेसमधून भाजपात गेलेले अशोक चव्हाण आणि शिंदे गटात गेलेले मिलिंद देवरा यांच्यासह सहा उमेदवार मंगळवारी राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले. विजयी उमेदवारांमध्ये भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे, शिंदे सेनेचे देवरा, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे

राज्यातील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सहा मतदारसंघांसह १६ राज्यांमधील ५६ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या होत्या. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत या ६ जागांवर नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र या कालावधीत ना कुठले नवे नामांकन झाले

ना कुणी आपले नाव मागे घतले. यामुळे ६ जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.

Latest News