शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी तोरणा किल्ल्यावर रायला निवासी शिबिराचे आयोजन.

चिंचवड : ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व जगदाळे कोचिंग क्लासच्या वतीने दि. १७ व १८ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्ला येथे रायला या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले
. या शिबिरासाठी वाल्हेकरवाडी येथिल जगदाळे कोचिंग क्लासचे ४० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांसाठी धानेप येथे निवासाच्या ठिकाणी शिवव्याख्याते रो. निलेश मरळ यांचे तोरण व शिवराय या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते
. तसेच तोरणा किल्ल्यावर सहभागी विद्यार्थी /विद्यार्थीर्नीना गाईड मार्फत तोरणा किल्ला व परिसराची सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी विद्यार्थी /विद्यार्थीर्नीच्या विविध कला-गुणांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सौ. जयश्री भामरे व सौ. विजया जगदाळे यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सादर केलेल्या विविध कला गुणांचे परीक्षण करुन व गुणानुक्रम काढले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षिस म्हणून ट्राफी व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले
तसेच शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रो. सुभाष वाल्हेकर यांच्या वतीने कवितेचे पुस्तक व रो. आबासाहेब जाधव यांच्या वतीने वहयांचे वाटप करण्यात आले.
या रायला निवासी शिबिरामध्ये रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष रो. सुधीर मरळ, रो. गोविंद जगदाळे, रो. संदिप भालके, रो. गणेश बोरा, रो. रेश्मा बोरा, मास्टर उज्वल बोरा, जगदाळे क्लासचे माजी विद्यार्थी श्रुती जगदाळे, श्रवण जगदाळे, मृणाल जगदाळे व पालक विजय शिनलकर सहभागी झाले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या सर्वच सदस्यांनी जगदाळे क्लासेसच्या संचालक /विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
