नमो चषक २०२४ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०० हून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग

*”नमो चषक २०२४ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०० हून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग*

पिंपरी : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात ‘नमो चषक २०२४’ या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व चिंचवड विधानसभा आमदार अश्विनीताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभेतील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे स्पर्धा घेण्यात आली.

तीन वर्षापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अशा ५०० हून अधिक स्पर्धकांनी रांगोळी, चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. भाजयुमो सरचिटणीस शिवम डांगे यांनी भव्य चित्रकला स्पर्धांचे संयोजन केले.

या प्रसंगी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य महेश कुलकर्णी, माजी नगरसेवक सुरेश भोईर, भाजयुमो पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तुषार हिंगे, भाजयुमो प्रदेश सचिव अजित कुलथे, श्री शिवाजी उदय मंडळ अध्यक्ष गोडसे सर, भाजयुमो चिंचवड विधानसभा संयोजक योगेश चिंचवडे, प्रशांत आगज्ञान, सांस्कृतिक आघाडी धनंजय शाळिग्राम, भाजयुमो सरचिटणीस दीपक नागरगोजे, सतीश नागरगोजे, मोहन राऊत, भाजयुमो विद्यार्थी विभाग संयोजक कपिल अगज्ञान, प्रदीप सायकर, भावना पवार यांच्या भाजयुमो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest News