PCMC: संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्याच्या लोगोचे देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाडा येथे अनावरण…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- विश्वस्त भानुदास महाराज मोरे म्हणाले, “या वर्षी बीज सोहळा 27 मार्चला होत आहे. आतापासून 2025 च्या बीज सोहळ्यापर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दररोज कीर्तन होणार आहेत. प्रत्येक दिंडीला संत तुकाराम महाराज लोगोचे वाटप करण्यात येणार आहे.संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, देहू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे व सर्व सदस्य, वारकरी संप्रदायातील पदाधिकारी उपस्थित (Dehugaon) होते.श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव वर्षपूर्ती सोहळा यावर्षी साजरा होत आहे. यानिमित्त संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्याच्या लोगोचे देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाडा येथे अनावरण करण्यात आले.