धंगेकर यांना उमेदवारी जाहीर, आबा बागूल यांची नाराजी

aba-bagul

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)

काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेसकडून माजी उपमहापौर आबा बागूल लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागूल यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली.उमेदवारी देताना शहरातील ज्येष्ठांना विश्वासात घ्यायला हवे होते. अन्यायाविरोधात बोलणे म्हणजे पक्षाला विरोध नाही. तेच तेच चेहरे किती वेळा देणार? गटातटाचे राजकारण बंद केले पाहिजे, मी कुणाचे जोडे उचलणार नाही, अशी ठाम भूमिका आबा बागूल यांनी मांडली.

मी पक्षाचे काम केले, सर्व घटकातील नागरिकांशी जोडला गेलो आहे, मी प्रभागात काम केले आहे, तर माझ्यात कमी काय आहे, असा प्रश्न काँग्रेसचे आबा बागूल यांनी उपस्थित केला

. निष्ठावंतांना न्याय देणार नसाल तर न्याययात्रेचा उपयोग काय? मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे, वयाची सत्तरी आली. आताच काँग्रेसमध्ये आलेल्या, आमदार असलेल्या व्यक्तीलाच पुन्हा उमेदवारी का, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

Latest News