खान्देश मराठा पाटील समाज संघाचा ५ वर्धापनदिन उत्साहात साजरा…

पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- अहिराणी गितांचा सूर आणि धम्माल मस्ती कार्यक्रमांनी खान्देश मराठा पाटील समाज संघाचा पाचवा वर्धापन दिन मोठया उत्साहात आकुर्डी खंडोबामाळ, सभागृह येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त निलेश भदाणे होते. प्रमुख पाहुणे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, मा. नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शारदा सोनवणे, शेखर चिंचवडे, राजेंद्र साळुंखे, पाटील बुवा चिंचवडे, दै. सकाळच्या संपादिका शितल पवार, उद्योजक दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये, निलेश शशिकांत भदाणे यांना समाज भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच, भिला पाटील (सामाजिक कार्यगौरव पुरस्कार), रवींद्र सूर्यवंशी (उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार), प्रवीण भामरे (खांदेश रत्न पुरस्कार), गिरीश साळुंखे (युवा उद्योजक पुरस्कार), किशोर पाटील (खान्देश गौरव पुरस्कार), जितेंद्र शिंदे (समाजसेवा पुरस्कार), चेतन साळुंखे (उद्योग रत्न पुरस्कार), महेश पाटील (खान्देश गौरव पुरस्कार), अँड. विश्वासराव पाटील (सामाजिक न्यायभूषण पुरस्कार), संदीप शिसोदे (उद्योग रत्न पुरस्कार), डॉ. सोनाली पाटील (शिक्षण रत्न पुरस्कार), वर्षा सोनवणे (महिला उद्योजक पुरस्कार), मयूर पाटील (वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर पुरस्कार) देवून सन्मानित करण्यात आले.

उपायुक्त निलेश भदाणे यांनी खानदेशातील विविध चालीरिती, युवकांना स्पर्धा परीक्षेच्या सरावाबद्दल मार्गदर्शन केले. जगाच्या पाठीवर कुठे जा पण आपली मातृभूमी, मायबोलीचा विसर पडू देऊ नका, असे सांगितले. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मनोगत व्यक्त केले. पिंपरी चिंचवड शहराच्या जडण घडणी मध्ये खान्देशवासी बांधवांचा मोलाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आपल्या भाषणात समाजामार्फत सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. खान्देश मराठा पाटील समाज संघाच्या सामाजिक उपक्रमाबद्दल मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, राहुल कलाटे यांनी शुभेच्छा दिल्या. खान्देश मराठा पाटील समाज संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. खान्देशी गायक जगदीश सदानशिव, अंजना बर्लेकर, अभिनेत्री श्रावणी मोरे यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच, खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम चांगलाच रंगला. विजेत्या महिलांना नगरसेविका शारदा सोनवणे यांच्या हस्ते पैठणी देण्यात आल्या. हास्य सम्राट अभिनेता विलास शिरसाट यांनी कार्यक्रमात धम्माल मस्ती आणली.

कार्यक्रमाचे संयोजन उद्योजक शरद पाटील, पंकज निकम, मोतीलाल भामरे, मंडळाचे सचिव शंकर पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, संचालक प्रदीप शिरसाट, देविदास पाटील व सर्व पदाधिकारी, सभासद यांनी मोलाची कामगिरी बजावली. सूत्रसंचालन भटुलाल बागुल, भानुप्रिया पाटील यांनी केले. खानदेश मराठा पाटील समाज संघाचे सचिव शंकर पाटील यांनी आभार मानले.

Latest News