पुणे जिल्ह्यात जे गलीच्छ राजकारण आलंय ते कुठेतरी थांबायला पाहिजे- खासदार सुप्रिया सुळे

पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सगळ्यात जास्त त्रास त्या व्यक्तीने दिला आहे. तेव्हा मी उमेदवार होते आता नाहीये. त्यामुळे बारामती मतदारसंघात आता असे लोक जर फिरत असतील तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मला माहितीये. आजपासून कोणत्याही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला धमकी दिली तर मी खपवून घेणार नाही. त्या व्यक्तीला थोडं तरी समजलं असेल मी कोणाबद्दल बोलत आहे. दोघे तिघे फिरत होते, त्यातला सगळ्यात उत्साही तोच होता.‘विरोधात जे बोलायचं ते बोला, पण धमक्या आता सहन होणार नाही. आपल्या कार्यकर्त्यांना वारंवार धमक्या आल्या तर करारा जबाब मिलेगा. पुणे जिल्ह्यात जे गलीच्छ राजकारण आलंय ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आत्ता पासूनच विधानसभेच्या कामाला लागा. आपलं मैदान खाली आहे. ज्याला पहिजे त्याला तिकीट मिळेल. सगळे इच्छूक तिकडे आहेत,’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.जाहिरातबारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण मतदारसंघात फिरून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. याचा शेवट त्यांनी आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात केला . यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.‘गेल्या 11 महिन्यात खूप काही घडले आहे. तुम्ही मिर्झापूर सिरीज बघितली असेल तर समजेल. जेव्हा करू तेव्हा बारामती मिर्झापूरपेक्षाही डेंजरस असणार आहे. अशा अनुभवाचा मी कधीच आयुष्यात विचार केला नव्हता. काही लोक सगळीकडे धमक्या देतच फिरत होते. माझे एकावर लक्षच आहे, मी वाट बघतीये तो कधी धमकी देतोय. तो कुठे राहतो त्याचा पत्ता मला महिती नाही. त्याचं नाव लक्षात नाही पण माणूस लक्षात आहे.’

Latest News