PUNE: मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात आरोप प्रत्यारोप

पुणे – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- हिंजवडीमधील 35 ते 40 आयटी कंपन्या पुण्याच्या बाहेर जात आहेत. पुण्याला आता मंत्रिपद मिळाले आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. पण त्याचा उपयोग ठेकेदाराला न होता, पुणेकरांना व्हावा, एवढीच अपेक्षा आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे. पुणे दौऱ्यावरती असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी, धंगेकर ॲाक्टोबरमध्ये पुन्हा आमदार होतील, असा विश्वास खासदार सुळे यांनी व्यक्त केला. आमदार धंगेकर यांनी कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मृतांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.आजच मी कोयता गँगने तोडफोड केल्याची बातमी पाहिली. पाणी तुंबतय, ससूनची बदनामी सुरु आहे. ड्रग्ज येत आहे. त्यामुळे पुण्यासाठी पक्ष विरहीत फोरम स्थापन करणे आवश्यक आहेपुण्याचे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मोहोळ यांना लक्ष्य केले आहे.पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा पुणेकरांना व्हावा, ठेकेदारांना होऊ नये, असा खोचक टोला खासदार सुळे यांनी मोहोळ यांना नाव न घेता लगावला. ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो.उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही.” असे मोहोळ यांनी म्हंटले आहे. सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यानी प्रत्तुत्तर दिले आहे. मोहोळ यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “मा. सुप्रियाताई, शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं.

Latest News