शर्जील इमामच्या समर्थनात 50 जणांवर ”देशद्रोहाचा गुन्हा दाखल”

आझाद मैदानात 1 फेब्रुवारी रोजी ‘मुंबई गौरव एकता मेळावा 2020’ झाला होता कार्यक्रम सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी चुडावाला यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी चुडावाला यांच्यासह 50 जणांवर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमाम याच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 1 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुंबई गौरव एकता मेळावा 2020 नावाने प्रदर्शन करण्यात आले होते. या प्रदर्शनात शर्जील इमामच्या समर्थनात कथितरित्या घोषणाबाजी केल्याचे समोर आले होते. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी शर्जील इमामवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
शर्जील इमाम हा कथित भडकाऊ भाषण प्रकरणात देशद्रोहाच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या रिमांडवर आहे. शर्जील इमामने आसामला भारतापासून वेगळे करण्याचे वक्तव्य केलो होते. यामुळे त्याच्याविरोधात देशद्रोह आणि भावना दुखावल्याच्या आरोपांसह गुन्हा दाखल आहे.