PUNE: कोंढव्यातील मॅश हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर छापा….


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
मॅश हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कोंढव्यातील न्याती चौक परिसरात असलेल्या हाॅटेलवर छापा टाकून कारवाई केली. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लेखाजी शिंदे आणि पथकाने ही कारवाई केली.मॅश हाॅटेलचे मालक अली इरानी (वय ६६, रा. उंड्री), व्यवस्थापक अली सय्यद (वय २८, रा. येरवडा), कामगार थॉमस सुजय मंडल (वय ३०, रा. उंड्री), रंजन समर्थ पत्रा (वय २७, रा. उंड्री), राजकुमार वामन पंडीत (वय ३०, रा. महमदवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिनाभरापूर्वी कोंढव्यातील एका हाॅटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला होता.
कोंढव्यातील मॅश हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तंबाखूजन्य पदार्थ, हुक्का पात्र असा ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मुंबईतील कमला मिल परिसरात असलेल्या हुक्का पार्लरमध्ये आग लागून ग्राहकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्य शासनानेपुणेसह राज्यातील वेगवेगळ्या शहरात असलेल्या हुक्का पार्लरवर बंदी घातली होती.