पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून…


पुणे : ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)
विश्रांतवाडी परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून पतीने तिचा खून केला आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
माधुरी मनोहर मोरे (वय ४७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना धानोरी येथील मुंजोबा वस्ती लेन नंबर १० या ठिकाणी घडली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, माधुरी व मनोहर यांचा काही वर्षांपुर्वी विवाह झाला होता. त्यांना एकूण चार आपत्य आहेत. यातील तीन मुली आणि एक मुलगा आहे. दोन मुलींचा विवाह झालेला आहे. तर, ११ वर्षांचा एक मुलगा आहे
. दरम्यान मनोहर यांना दीर्घ आजार आहे. दरम्यान, मोरे दाम्पत्यामध्ये काही महिन्यांपासून सातत्याने भांडण होत होते. ४७ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर मनोहर हे संशय घेत असत आणि त्यांच्याशी वाद घालत होते. यावरूनच घटनेच्या रात्री त्यांच्यात भांडण झाले होते
.भांडणानंतर माधुरी या नेहमीप्रमाणे झोपलेल्या होत्या. त्यानंतर मनोहर याने पहाटेच्या सुमारास झोपेत असलेल्या पत्नी माधुरी यांच्या डोक्यात गॅस टाकी (सिलेंडर) डोक्यात घालून त्यांचा खून केला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.विश्रांतवाडी पोलिसांसह परिमंडळ पाचचे उपायुक्त हिम्मत जाधव तसेच वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पाहणी करून मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.
तर, पती मनोहर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.