बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांला खंडणी विरोधी पथका कडून अटक…


पुणे: ( ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना-)
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दुहेरी कारवाई करत बेकायदा पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने सापळा रचून अटक केली आहे.उत्तमनगर व शिवने परिसरात या कारवाया केल्या असून, पोलिसांनी दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त केले आहे. त्यांनी हे पिस्तूल कोणाकडून आणले होते, याबाबत तपास करण्यात येत आहे.
पहिल्या कारवाईत राहुल कृष्णा गायकवाड (वय ३८, रा. इंद्रा वसाहत, गणपती मंदिर मागे, एनडीए रोड, उत्तमनगर) याला अटक केली आहे. तर दुसऱ्या कारवाईत युवराज लेकराज वर्मा (वय २९, रा. सर्वे नंबर १५, गोसाळ चाळ जवळ, उत्तम नग) याला अटक केली आहे.
याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे व पोलीस निरीक्षक शैलेश संखे अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, मयूर भोकरे व त्यांच्या पथकाने केली आहे.
मुंबईत बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापुर्वी पुण्यातही अशा अवैधरित्या पिस्तूलांमधून पद्धतीने गोळ्या झाडून खून झाले आहेत. गेल्याच महिन्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून झाला होता. त्यामुळे पुणे पोलिसांकडून अवैध रित्या पिस्तूल बाळगणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे
.यादरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एककडील अधिकारी व अमलदार उत्तमनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. तेव्हा पोलीस हवलदार राजेंद्र लांडगे व पोलीस हवलदार अमोल आवाड यांना राहुल गायकवाड याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याजवळ १ पिस्तूल व १ काडतूस मिळाले.
तर, त्याचवेळी पोलीस हवलदार राजेंद्र लांडगे व पोलीस अंमलदार मयूर भोकरे यांना युवराज वर्मा याच्याकडे पिस्तूल आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने शिवने परिसरात छापा कारवाईकरून युवराज याला पकडले. त्याची झडती घेतल्यानंतर एक पिस्तूल व एक काडतूस मिळाले.
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना देखील सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी वानवडी येथे शाळेतील एका लहान मुलीवर स्कूल व्हॅनमध्ये अत्याचाराची घटना घडली. त्यातच गोळ्या झाडून हत्या होत आहेत