भोसरीमध्ये कामगारांच्या अंगावर पाण्याची टाकी पडल्याने 3 जणांचा मृत्यू….

taki

पिंपरी- ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

भोसरीतील सद्गुरु नगर मध्ये लेबर कॅम्प मध्ये राहणाऱ्या मजुरांसाठी बारा फूट उंचीवर पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. आज सकाळी आठच्या सुमारास काही कामगार पाण्याच्या टाकीखाली अंघोळ करत होते. तेव्हा, निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेली पाण्याची टाकी कोसळली. चिंचवड शहरातील भोसरीमध्ये पाण्याची टाकी कामगारांच्या अंगावर कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दल, पिंपरी- चिंचवड पोलीस दाखल झाले आहेत.

तर सहा ते सात कामगार गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे.जागीच तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सहा ते सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Latest News