राष्ट्रवादीची उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, चिंचवड ,राहुल कलाटे, भोसरी, अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर


पुणे(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- )
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये काही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. चिंचवड-राहुल कलाटे, भोसरी-अजित गव्हाणे, यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली आहे.
वाशिममधील कारंजा-ज्ञायक पाटणी, हिंगणघाट-अतुल वांदिले, नागपूरमधील हिंगणा-रमेश बंग, अणुशक्तीनगर-फाहद अहमद, चिंचवड-राहुल कलाटे, भोसरी-अजित गव्हाणे, माजलगाव-मोहन जगताप, परळी-राजेसाहेब देशमुख, मोहोळ-सिद्धी कदम यांच्यासह आदी जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.